ओतूर : ओतूर (ता.जुन्नर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते या करिता शुक्रवारी ७०.५६ टक्के मतदान झाले. एकूण १४ हजार दोनशे पंच्याहत्तर पैकी १० हजार ७३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहीती निवडणुक अधिकारी लक्ष्मण झांजे यांनी दिली.
या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शेतकरी संघटना या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शुक्रवारी सकाळी चैतन्य विद्यालयाचे जुन्या शाळेत व महालक्ष्मी मैदानावरील चैतन्य विद्यालयाच्या नवीन व जुन्या दोन्ही इमारतीत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची अशा सर्व ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करून मतदान सुरू करण्यात आली. एका वार्डसाठी तीन वर्गखोल्या अशा एकूण सहा वार्डसाठी १८ वर्गखोल्या मतदान केंद्र म्हणून वापरण्यात आल्या होत्या. सकाळी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. सर्वत्र मतदान केंद्रा बाहेर रांगा लागल्या होत्या. दुपारी थोडी गर्दी कमी होती. मात्र सायंकाळी परत मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली असल्याने काही ठिकाणी उशीरापर्यंत मतदान सुरु होते.
--
वार्डनिहाय झालेले मतदान -
वार्ड क्र.१ मध्ये -१७१९,वार्ड क्र.२ मध्ये-१३७७ ,वार्ड क्र.३ मध्ये-१६०७ ,वार्ड क्र.४ मध्ये-१६०८,वार्ड क्र.५ मध्ये-२०४९,वार्ड क्र.६ मध्ये-१७१३ असे एकुण १० हजार ७३ मतदारांनी मतदान केले.ओतूरचे एकूण ७०.५६ टक्के मतदान झाले आहे.
--
शंभरी पार आजींचे उत्साहात मतदान.
ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः वयाची शंभरी पार केलेल्या १०५ वर्ष वयाच्या भिकुबाई छबुराव रसाळे यांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावला.मतदानासाठी आलेल्या गावातील वयोवृध्द जेष्ठ नागरिक , विकलांग व्यक्ती आणि महिला वर्गाच्या गर्दीने उपस्थितांचे चांगलेच लक्ष वेधले.
---
फोटो -१०५ वयाच्या भिकुबाई छबुराव रसाळे .