आसखेड : यंदाच्या वर्षी वेळीअवेळी पडलेल्या पावसामुळे भामा-आसखेड धरणात सध्या ७२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर गतवर्षी ५४.२० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी झालेल्या सुमारे १२९२ मिलिमीटर पाऊसामुळे विहिरी - नाले आजपर्यंत समाधानकारक भरलेले आहेत. त्यामुळे मार्चअखेर जवळ आला तरी पाणीप्रश्न अजून मोठ्या प्रमाणात निर्माण झाला नसल्याची माहिती भामा-आसखेडचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरणात सध्या ७२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १६ ते १८ नोव्हेंबर या तीन दिवसांदरम्यान धरणातून ५५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, तर २४ डिसेंबरला ७८३ वरून ८६० क्युसेक्स सोडून ३ जानेवारी १८ ला बंद, ३१ जानेवारी १८ ला ८४५ क्युसेक्सने सोडून २ फेब्रुवारीला बंद, तर २० फेब्रुवारीला ६०० क्युसेक्स, ९५० वरून १००० क्युसेक्सने पाणी सोडून ३ मार्च १८ ला विसर्ग बंद करण्यात आला होता. असा चार वेळा विसर्ग सोडण्यात आला होता.धरणाची सध्याची पाणीपातळी ६६७.३७ मीटर इतकी आहे, तर पाणीसाठा १७१.९२४ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा १५८.४०२ दलघमी इतका आहे.यंदा धरण वेळोवेळीच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरल्याने बºयाचदा विसर्ग सोडावा लागला. पूर्ण भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना होणार आहे.त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना वरदान ठरले आहे, तर नदीकाठाजवळपासच्या गावांची तहान भागणार आहे.>शेतपिकाच्यापाण्याची चिंता मिटलीवेळोवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे त्याचा फायदा खेड तालुक्यासह शिरूर, दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि विविध गावच्या पाणी योजनांना झाला तर झालाच, पण त्याबरोबरच नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले. त्यामुळे २-३ महिने नदीकाठच्या शेतकºयांची शेतपिकाच्या पाण्याची चिंता मिटली.
भामा-आसखेडमध्ये ७३ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:20 AM