पुणो : महापालिकेच्या शाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळविणा:या विद्याथ्र्याना शारदाबाई पवार यांच्या नावाने 51 हजार रुपयांची शिष्यवृत्ती व पारितोषक दिले जाते. त्यासाठी दहावीचे 73 विद्यार्थी पात्र ठरले असून, बारावीचा एकही विद्यार्थी पात्र ठरलेला नाही. मात्र, एका विद्याथ्र्याला एकाच शिष्यवृत्तीचा लाभ देण्याची शिफारस करणारा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर झाला आहे.
पालिकेच्या 2क्14-15 च्या अर्थसंकल्पात शारदाबाई पवार शिष्यवृत्तीसाठी 21 लाख 25 हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार नागरवस्ती विभागाने विद्याथ्र्याकडून अर्ज मागविले होते. त्यामध्ये दहावीेत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले 73 विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. मात्र, प्रत्येक विद्याथ्र्याला 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यासाठी मिळून 37 लाख 23 हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे उर्वरित 16 कोटींचा निधी वर्गीकरणाने मिळणार आहे. मात्र, ज्या विद्याथ्र्याना मौलाना अबुल कलाम आझाद व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या संबंधितांना एकावेळी एकाच शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल, अशी शिफारस प्रस्तावात करण्यात आली आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये बारावीच्या विद्याथ्र्याची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करणो गरजेचे आहे. याकरिता प्रशासकीय पातळीवर या विद्याथ्र्यासाठी विशेष योजना राबवून त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणो होणो गरजेचे आहे. जेणोकरून या विद्याथ्र्याच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)