शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Ganeshotsav 2022: गणेशोत्सवानिमित्त राज्यात मध्य रेल्वेतर्फे ७४ विशेष रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 1:13 PM

पाच मार्गांवर या रेल्वे धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली.

पुणे : मध्य रेल्वेतर्फे आगामी गणेश उत्सवानिमित्त ७४ श्रीगणेशोत्सव विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई-सावंतवाडी, नागपूर-मडगाव, पुणे-कुडाळ, पुणे-थिवीम/कुडाळ-पुणे आणि पनवेल-कुडाळ/थिवीम-पनवेल अशा पाच मार्गांवर या रेल्वे धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली.

गाड्यांचा तपशील..

१) मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (४४ सेवा)

- ०११३७ ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम), मुंबई येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज रात्री सव्वाबारा वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुपारी दोन वाजता पोहोचेल.- ०११३८ ही रेल्वे सावंतवाडी रोड येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी अडीच वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) मुंबई येथे दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता पोहोचेल.

२) नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ सेवा)

- ०११३९ ही रेल्वे नागपूर येथून २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी सव्वातीन वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचेल.- ०११४० ही रेल्वे मडगाव येथून २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी संध्याकाळी सात वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता पोहोचेल.

३) पुणे - कुडाळ विशेष (६ सेवा)

- ०११४१ ही रेल्वे पुणे येथून २३ आणि ३० ऑगस्ट रोजी तसेच ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी दुपारी दोन वाजता पोहोचेल.- ०११४२ ही रेल्वे कुडाळ येथून २३ आणि ३० ऑगस्ट रोजी तसेच ६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास पोहोचेल.

४) पुणे - थिवीम/कुडाळ - पुणे विशेष (६ सेवा)

- ०११४५ ही रेल्वे पुणे येथून २६ ऑगस्ट, तसेच २ आणि ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि थिवीम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहोचेल.- ०११४६ ही रेल्वे कुडाळ येथून २८ ऑगस्ट, तसेच ४ आणि ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास पोहोचेल.

५) पनवेल - कुडाळ/थिवीम - पनवेल विशेष (६ सेवा)

- ०११४३ ही रेल्वे पनवेल येथून २८ ऑगस्ट, तसेच ४ आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी दुपारी दोन वाजता पोहोचेल.- ०११४४ ही रेल्वे थिवीम येथून २७ ऑगस्ट, तसेच ३ आणि १० सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास पोहोचेल.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीrailwayरेल्वे