पुणे : लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेले ७४ विद्यार्थी शुक्रवारी (दि. १) रात्री सुखरुपपणे पुण्यात परतले. स्वारगेट येथील बसस्थानकात चार बसमधून हे विद्यार्थी आले. त्यांची आरोग्य तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठविण्यात आले.कोटा येथे विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी गेलेले महाराष्ट्रातील १ हजार ७६४ विद्यार्थी अडकले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना घरी परतणे शक्य होत नव्हते. त्यांना परत आणण्यासाठी राज्य शासनाकडून एसटी महामंडळाच्या ७२ बस पाठविण्यात आल्या होत्या. गुरूवारी या बस विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्राकडे रवाना झाल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७४ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना घेऊन शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पहिली बस स्वारगेट बसस्थानकात आली. त्यानंतर काही वेळेच्या अंतराने रात्री साडे बारा वाजेपर्यंत तीन बस आल्या. बसमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यात आले होते. तसेच स्थानकात बस येण्यापुर्वीच विद्यार्थ्यांच्या तपासणीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. बस आल्यानंतर आठ बस चालकांसह सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून घरी पाठविण्यात आले. एसटीच्या पुणे विभाग वाहतुक नियंत्रक यामिनी जोशी म्हणाल्या, विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर कोणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांच्या पालकांना आधीच बसस्थानका येण्याचे निरोप देण्यात आले होते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांचे पालक आले होते. केवळ तीन-चार विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थी पुण्यातीलच होते.-------------------पुण्यात अडकलेले विद्यार्थी, मजुरांना त्यांच्या गावी परत जाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. राज्यातील लोकांना एसटीमार्फत पोहचविले जाण्याची शक्यता आहे. तर परराज्यातील लोकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. मात्र, अद्याप याबाबत एसटी किंवा रेल्वे प्रशासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही मागणी करण्यात आलेली नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.---------------
लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेले ७४ विद्यार्थी शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 7:04 PM
कोटा येथे विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी गेलेले महाराष्ट्रातील १ हजार ७६४ विद्यार्थी अडकले होते.
ठळक मुद्देबस आल्यानंतर आठ बस चालकांसह सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंगविद्यार्थ्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून पाठविण्यात आले घरी