पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या हेरिटेज वास्तूंचे जतन संवर्धन करण्यास महापौर निधीतून ७५ लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ऐतिहासिक शैक्षणिक वास्तूचे जतन संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यास एक महत्त्वपूर्ण इतिहास उत्तम प्रकारे जतन होणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले. पुणे शहरात एकूण २५१ हेरिटेज वास्तू आहे. पालिकेच्या मालकीच्या ताब्यात असलेल्या हेरिटेज वास्तूंचे जतन संवर्धनाचे काम पुणे पालिकेच्या वतीने केले जाते . डेक्कन कॉलेज पुणे पालिकेच्या ग्रेड वन यादीत समाविष्ट आहे. ही संस्था १८६४ साधी बांधण्यात आली असून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्वशास्त्र, संस्कृत मराठा इतिहास ,प्राचीन भाषाशास्त्र या विषयात मूलभूत संशोधन कार्य केले जाते . पुरातत्व शास्त्र व भाषाशास्त्र या विषयांमध्ये एम.ए आणि पीएचडीचे अध्यापन केले जाते . या प्रकारे शिक्षण देणारी ही देशातील एकमेव संस्था आहे .या संस्थेमध्ये पुरातत्त्व विषयावर संशोधन करण्यासाठी देश आणि विदेशात विद्याथ्यार्ने संशोधक येत असतात . या संस्थेच्या हेरिटेज इमारतीची पडझड झालेली असून रुफचे पत्रे खराब झाले आहेत. पावसाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन रुफ खालील लाकडे मोठ्या प्रमाणावर सडली आहेत. या वास्तूच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात ओल आली आहे. कलाकुसरीचे लाकूड काम खराब झालेले आहे .पॅसेजमधील दगडी पेव्हीग खचलेले आहे. पावसाळी पन्हाळी नादुरुस्त झालेल्या आहेत. ब्रिटिश कालीन कलाकुसरीच्या खिडक्या च्या काचा फुटलेल्या आहेत . दगडी बांधकामाचे लाईम पॉईटीग उखडलेले असुन ब-याच ठिकाणी दगड निसटलेले आहेत.त्यामुळे या वास्तूचे जतन संवर्धन साधारणपणे साडेतीन कोटींची आवश्यकता आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी २०१७ -१८च्या महापौर निधीतून या कामास ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला होता . मात्र अदयापही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या हेरिटेज वास्तूंचे जतन संवर्धन करण्यास महापौर निधीतून ७५ लाख रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे, असे सुनिल कांबळे यांनी सांगितले.
डेक्कन कॉलेजच्या हेरिटेज वास्तुसाठी ७५ लाख देण्यास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 7:52 PM
पुणे शहरात एकूण २५१ हेरिटेज वास्तू आहे...
ठळक मुद्देडेक्कन कॉलेज संस्था १८६४ साधी बांधण्यात आली असून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना