सकाळी सात वाजल्यासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
एकूण १४,००६ पैकी १०,६१२ मतदारांनी (७५.७६%) मतदानाचा हक्क बजावला. वार्ड क्रमांक १ मध्ये सर्वाधिक मतदान झाले. एकूण २०७४ पैकी १६७८ मतदारांनी (८०.९०%) मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक २ मध्ये २९७३ पैकी २१४० मतदारांनी (७१.९८%) मतदान केले.
वार्ड क्रमांक ३ मध्ये १८२३ पैकी १३७५ मतदारांनी (७५.४२%) मतदान केले. वार्ड क्रमांक ४ मध्ये २०४७ पैकी १५७५ मतदारांनी (७६.९४%) मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक ५ मध्ये २४६० पैकी १८०३ मतदारांनी (७३.३२%) मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक ६ मध्ये २६३१ पैकी २०४१ मतदारांनी (७७.५७%) मतदारांनी मतदान केले.
वार्ड क्रमांक १ व ६ मध्ये मतांचा टक्का वाढलेला दिसला. सर्वच १७ जागांसाठी चुरशीने मतदान झालेले असल्याने आता सोमवार (दि.१८) रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- यवत पोलीस स्टेशन हद्दीतील २८ गावांमध्ये शांततेत मतदान...
यवत पोलीस स्टेशन हद्दीत एकूण २८ गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. २८ पैकी यवत , पाटस, वरवंड, बोरीपारधी या चार मोठ्या लोकसंख्येची गावे समाविष्ट होती. २८ गावांमध्ये १४४ बूथमध्ये मतदारांनी मतदान केले. कुसेगाव येथील किरकोळ बाचाबाची वगळता सर्वत्र कसलाही वाद न होता मतदान प्रक्रिया पार पडली असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १० पोलीस अधिकारी व सुमारे २०० पोलीस कर्मचारी बंदोबस्त साठी तैनात होते.
यवत येथे मतदान केंद्रावर वृद्ध महिलेला मतदानासाठी उचलून घेऊन जाताना कार्यकर्ते.