वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे सचिव
सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबईचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, प्रशासकीय नियंत्रक एस. चोक्कलिंगम दूरचित्रप्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली. डॉ. रमेश भोसले प्रास्ताविक करतील, तर डॉ. समीर जोशी आभार मानतील.
बैरामजी जीजीभॉय यांच्या देणगीतून १८७१ पासून सुरू असलेल्या मेडिकल स्कूलचे रुपांतर होऊन २३ जून १९४६ रोजी या महाविद्यालयाची सुरुवात झाली. महाविद्यालयाने आजवर हजारो निष्णात वैद्यकीय
पदवीधर व पदव्युत्तर डॉक्टर्स घडविलेले आहेत. ‘बॉम्बे’ रक्तगट, निद्रेतील रासायनिक क्रिया, ‘ससून हॉस्पिटल सिंड्रोम’ विकार, ‘एचआयव्ही’बाधित मातेच्या गर्भाचे बाधासंरक्षण इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनाने जगामध्ये ज्ञानवृध्दी केली आहे. (पेटंटद्वारे व महाविद्यालयाच्या रिसर्च सोसायटीद्वारे) आंतरराष्ट्रीय संशोधनात ही संस्था अग्रज असून विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर संशोधनात सहभागी आहे. या संस्थेने जर्मन बेकरी बॉम्बस्फोटसारख्या दुर्घटना, स्वाईनफ्लू व कोविड-१९ सारख्या संकटांचा
खंबीरपणे मुकाबला केला आहे. सध्या या महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या ससून सर्वोपचार रुणालयाद्वारे ८ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना विविध आरोग्य सेवा समर्थपणे पुरवल्या जात आहेत.