शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

कुकडीत ७६ टक्के पाणीसाठा

By admin | Published: August 26, 2014 5:06 AM

जुन्नर, आंबेगाव, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा, पारनेर आदी तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पात आज रोजी ७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

येडगाव : जुन्नर, आंबेगाव, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा, पारनेर आदी तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पात आज रोजी ७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पातील धरण परिसरात अद्यापही पावसाचा ओघ कायम आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढत होत असली, तरी मागील वर्षीपेक्षा आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात ११ टक्के पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी कुकडी प्रकल्पात आजच्या तारखेला ८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यास ३० जुलै पासून १३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आल्यामुळे येडगाव धरणाची पाणी कमी होत आहे; तर इतर धरणांमधील पाणीपातळीत वाढ होत आहे. कुकडी प्रकल्पात आज अखेर पावसामुळे साडे बत्तीस टीएमसी नवीन पाणी आले असून, त्या-त्या धरणाची पूरपरिस्थिती लक्षात घेऊन धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात २६५५० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता, तो टक्केवारीमध्ये ८७ टक्के इतका होता. यावरून या वर्षी आजच्या तारखेला मागील वर्षीपेक्षा आज ११ टक्के इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे.वडज धरणातून नदीला २०० क्युसेक्सने, तर कालव्याला २५४ क्युसेक्सने, पिंपळगाव जोगे धरणातून नदीस १५० क्युसेक्स, डिंंभा धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्स, उजव्या कालव्यास १५० क्युसेक्स व येडगाव धरणातून डाव्या कालव्यास १३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून, चिल्हेवाडी धरणातूनदेखील येडगाव धरणात ८०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. (वार्ताहर)