पुणे : पुणे जिल्ह्यात आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. प्रमुख मोठी १४ धरणांतीलपाणीसाठी ९० टक्क्यांहुन अधिक झाला आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्याती हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या खडकवासला प्रकल्पात २३.०२ टीएमसी (७८.९७ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला, कळमोडी, वडीवळे आणि आंध्रा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर वीर, कासारसाई, निरा देवघर, गुंजवणी, पानशेत, भामा आसखेड, पवना, चासकमान, वरसगाव, मुळशी, डिंभे, येडगाव, भाटघर, टेमघर, वडज आदी १५ धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे..-----उजनी धरणात ३५.११ टक्के पाणीसाठा जमापुणे, सोलापूर, अहमदनगरचा काही भाग तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणात सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३५.११ टक्के पाणीसाठा (१८.८१ टीएमसी) जमा झाला आहे. बंडगार्डन पुल येथून १३ हजार ८३० क्युसेक, तर दौंड येथून १७ हजार १८५ क्युसेक पाण्याच्या विसर्ग उजनी धरणात येत आहे.------चौकटजिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची माहितीधरण - प्रकल्प साठा - सध्याचे टीएमसी टक्केवारीटेमघर ३.७१ २.३४ ६३.०८वरसगाव १२.८२ ९.६० ७४.८७पानशेत १०.६५ ९.११ ८५.५५खडकवासला १.९७ १.९७ १००पवना ८.५१ ६.८७ ८०.७४कासारसाई ०.५७ ०.४९ ८५.६२मुळशी १८.४७ १३.८५ ६८.७२कळमोडी १.५१ १.५१ १००चासकमान ७.५८ ५.९१ ७७.९८भामा आसखेड ७.६७ ६.११ ७९.६६ आंध्रा २.९२ २.९२ १००वडीवळे १.०७ ०.९१ ८४.७३शेटफळ ०.६० ०९ १५.४१गुंजवणी ३.६९ ३.२४ ८७.७७भाटघर २३.५० १४.९५ ६३.६३नीरा देवघर ११.७३ १०.५४ ८९.८६वीर ९.४१ ९.०७ ९६.४१नाझरे ०.५९ ०.०७ १२.०३पिंपळगाव जोगे ३.८९ ०.०४ ०.०४माणिकडोह १०.१७ ३.२७ ३२.१०येडगाव २.८० १.३३ ६८.२०वडज १.१७ ०.५८ ४९.५६डिंभे १२.४९ ८.०८ ६४.६६चिल्हेवाडी ०.९६ ०.६२ ६४.९४घोड ५.४७ १.२५ २५.७३विसापूर ०.९० ०.०७ ८.२९उजनी ५३.५७ १८.८१ ३५.११