शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

राज्यात ७८ टक्के पेरण्या पूर्ण; सोयाबीन, कपाशी १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 6:25 AM

खरीपाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून, १ कोटी ११ लाख ४८ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र होत असलेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्या मार्गी लागल्या असून, आतापर्यंत १ कोटी ११ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनची गेल्या वर्षाच्या तुलनेत १०४ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. कपाशीचीही लागवड ३९ लाख ५९ हजार हेक्टरवर अर्थात १०० टक्के झाली आहे. 

खरीपाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून, १ कोटी ११ लाख ४८ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुगाची पेरणी ३५ टक्केच म्हणजे १ लाख ३८ हजार ४९९ हेक्टरवर झाली आहे. उडीद पिकाची १ लाख ६० हजार ४३८ हेक्टरवर पेरणी झाली असून, ती सरासरी क्षेत्राच्या ४३ टक्के आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत राज्यात पाऊस राहील. त्यानंतर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती कृषी आयुक्त  सुनील चव्हाण यांनी दिली.

तब्बल ४३ लाख हेक्टरवर सोयाबीन

n राज्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनखाली असून, सरासरी ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टरवर पेरणी केली जाते. गेल्यावर्षी ४३ लाख २० हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र, १०० टक्के अर्थात ४३ लाख ४ हजार १७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. n कपाशीची आतापर्यंत ३९ लाख ५९ हजार १६१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हेच क्षेत्र ३९ लाख ७८ हजार ५६६ हेक्टर इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

भात लागवडीला वेगराज्यात कोकण, तसेच घाट परिसरातील पुणे, नाशिक, कोल्हापूर व पूर्व विदर्भात चांगला पाऊस झाल्याने भाताच्या पुनर्लागवडीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. राज्यात भाताचे सरासरी पेरणी क्षेत्र १५ लाख ८ हजार ३७४ हेक्टर असून, आतापर्यंत ५ लाख १७ हजार ४१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या ही लागवड ३४ टक्के, तर गेल्यावर्षीच्या तुलनेत ८३ टक्के आहे.

सांगली, कोल्हापुरात सर्वांत कमी पाऊसकोकण विभागात सरासरीच्या ९०.६ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल नागपूर  ८८.५ टक्के, पुणे ४३.३, नाशिक ६७.६, अमरावती ७४.५, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ७१.२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वांत कमी पाऊस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ३७ टक्के, तर सर्वाधिक पालघरमध्ये १२६ टक्के झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMumbaiमुंबईRainपाऊसPuneपुणे