शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

बाप्पाची कृपा अन् पाेलिसांच्या प्रयत्नांनी मिळाले ७९ लाख; ज्येष्ठ व्यावसायिकाची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 9:54 AM

ज्येष्ठाची घरफोडी होऊन त्यात डायमंड, सोन्याचांदीचे दागिने असा ९५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता

पुणे : गणपतीचा मी निस्सीम भक्त आहे. आपण चांगले काम केलेले असल्याने आपले कोणी काही वाकडे करणार नाही, असा विश्वास बाळगून होतो. अखेर बाप्पाच्या कृपेने आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी चोरीला गेलेले दागिने परत मिळाले, अशी भावना ज्येष्ठ व्यावसायिक जयंत इनामदार यांनी सांगितले. त्यांचे चोरीला गेलेले ७९ लाख ८४ हजार ४८० रुपयांचे दागिने गुरुवारी परत मिळाल्यानंतर ते बाेलत हाेते.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते जयंत इनामदार यांचे चोरीला गेलेले दागिने परत देण्यात आले. यावेळी उपायुक्त सुहेल शर्मा, अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश तटकरे, संगीता पाटील उपस्थित होते. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी संगीता पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.जयंत इनामदार (वय ७०, रा. मुनिज बंगला, कर्वेनगर) यांचा बंगला बंद असताना २७ ऑक्टोबर २०२२ रोजी घरफोडी होऊन त्यात डायमंड, सोन्याचांदीचे दागिने असा ९५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्यात तपास करताना पोलिस अंमलदार धीरज पवार, सागर केकाण, नितीन राऊत यांना एक पुरुष व एक महिला संशयास्पदरीत्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यावरून त्यांनी राजू दुर्योधन काळमेघ (वय ४५, रा. पर्ल सोसायटी, क्रांतीनगर, वडगाव) याला अटक केली. वाकड येथून सोनिया श्रीराम पाटील (वय ३२) ही सर्व माल घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला पकडले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी हे दागिने परत करण्यात आले. जयंत इनामदार हे आरसीसी कन्सल्टंट आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराचे काम त्यांनी केले. तसेच दत्तमंदिराचे काम त्यांनी केले.

इनामदार यांनी सांगितले की, पोलिसांनी अतिशय चिकाटीने तपास केला. एका सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याची अर्धवट पँट दिसली होती. त्यावरून परिसरातील सर्व कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्यांनी पाच दिवसांत आरोपींना पकडले. पोलिसांनी अतिशय मेहनत घेऊन या गुन्ह्याचा शोध लागला. त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे 

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSenior Citizenज्येष्ठ नागरिकCrime Newsगुन्हेगारीGoldसोनं