पुणे : मुंबईत रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची दणादाण उडाली. मुंबई विभागातील कल्याण-कसारा विभागातील खडवली-टिटवाळा दरम्यान पाणी साचल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणार्या सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह आठ गाड्या रद्द करण्यात आले. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणार्या चाकरमान्यांना फटका बसला. रविवारी रात्री मुंबईमध्ये मुुसळधार पाऊस झाला. यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक मार्गावर ठिकठिकाणी रेल्वे थांबण्यात आले होते. तर काही ठिकाणी ठिकाणी धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा विभागातील खडवली-टिटवाळादरम्यान रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सोमवारी सकाळी रेल्वेची सेवा विस्कटली होती. त्यामुळे पुण्यातून मुंबईकडे जाणार्या चार गाड्या आणि मुंबईतून पुण्याला येणार्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचा फटका चाकरमान्यांना बसला. तसेच मुंबईतून सकाळी निघणार्या उद्यान, कोयना, चैनई, हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्या तीन ते चार तास उशिरा धावल्या. तसेच मुंबईतून पुण्याकडे येणार्या सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी आणि डेक्कन क्वीन रद्द करण्यात आले.
सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द
By अजित घस्ते | Published: July 08, 2024 6:06 PM