पुणे: बसचालकाच्या जागी दुसराच कुणीतरी बसला होता आणि आरोपी व आठ वर्षीय चिमुकली मागच्या सीटवर् बसल्याचे बस थांबल्यानंतर आईच्या निदर्शनास आले.. आईने घाबरलेल्या मुलीकडे विचारपूस केल्यावर् मुलीनेझालेला प्रकार् सांगितला.
न्यायालयाने शालेय बस प्रवासा दरम्यान आठ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करत लैगिंक छळ करणार्या बस चालकाला पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही वडगाव मावळचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी निकालात नमूद केले आहे. विकास बाळू तिकोणे असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 16 ऑगस्ट 2018 रोजी उघडकीस आली. घटनेच्या दिवशी पीडितेची आई शाळेच्या बसची वाट पाहत होती. घटनेच्या दिवशी पीडितेची आई शाळेच्या बसची वाट पाहत होती.
बस मधून उतरल्यानंतर आईला मुलगी घाबरलेली दिसली. यावेळी, तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर कांबळे याने केलेल्या कृत्याची माहिती पीडितेने पालकांना दिली. तसेच, कोणाला काही सांगितल्यास मारण्यासह शाळेत न सोडण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर, लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात, सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनिल मोरे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये, पीडित मुलगी, मुलाची आई, दुसरा चालक, वैद्यकीय अधिकारी व पंच साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सरकारपक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलीस हवालदार व्ही. एम. सपकाळ यांनी न्यायालयीन कामकाजात सरकार पक्षास मदत केली.