स्वच्छ, सुंदर, आदर्श व तंटामुक्त असणारे अशी ओळख असणारे हे गाव. दुर्गम डिंगरी भागातील भाटघर धरणाच्या कुशीतील कमी लोकसंख्या असलेलं बारे हे गाव आहे. कैकाडी वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता कच्चा होता . तेथील वस्तीवरील नागरिकांनी उपसरपंच स्वाती दानवले यांच्याकडे मागणी केली होती. त्यामुळे उपसरपंच स्वाती दानवले व माजी सरपंच सोपान दानवले यांनी रस्ता स्वखर्चाने बांधून दिला. जवळपास हा रस्ता ८० मीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट करून दिला. कैकाडी वस्तीवर जाणारा रस्ता सिमेंटचा झाल्यामुळे तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
यावेळी शांताराम पवार, गणेश दानवले, कुंडलिक साळेकर, सचिन दामगुडे, रघुनाथ दानवले हे उपस्थित होते.
फोटो - कैकाडी वस्तीकडे जाणारा रस्त्याचे काम पूर्ण झालेले दाखविताना.
छाया - स्वप्निलकुमार पैलवान