पुरंदर मध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील वर्षी ३० सप्टेंबरमध्ये आमदार संजय जगताप , महसूल ,आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार मार्तंड देवसंस्थानच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण आढळल्याचे प्रमाण अगदी नगण्य म्हणजेच केवळ २किंवा ३रुग्ण येथील कोविड सेंटर मध्ये दाखल झाले होते .त्यामुळे १०फेब्रुवारीला कोविड सेंटर बंद करण्यात आले होते .मात्र मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. विशेषतः वाल्हा, नीरा व पुरंदरच्या पूर्व भागातील बाधितांवर उपचार होण्यासाठी देवसंस्थानने जेजुरीचे कोविड सेंटर सुरू केले दोनच दिवसात या ठिकाणी ८० रुग्ण दाखल झाले आहेत. सध्या येथील रुग्णांच्या उपचारासाठी २ वैदयकीय अधिकाऱ्यांसह ६ परिचारिका व देवसंस्थानच्या वतीने एक अधिकारी व १६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. देवसंस्थानच्या वतीने चहा ,नास्ता ,व दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.तसेच दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
०१ जेजुरी कोविड सेंटर