पुणे - जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी रविवारी उत्साहात मतदान झाले. ग्रामस्थांनी मतदानाला भरघोस प्रतिसाद दिला. ८४.७३ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुठेही गैरप्रकार घडला नाही. उन्हाचा तडाखा असल्यामुळे सकाळी मतदानाचा ओघ जास्त होता. दुपारी हा ओघ कमी झाला. यानंतर पुन्हा ४ नंतर मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढली. सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा शुक्रवारी थंडावला. रविवारी ९० ग्रामपंचायती व २५८ ग्रामपंचायतींमधील ४५६ रिक्त पदांसाठी मतदान होणार असून, गावकारभाºयांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. थेट जनतेतून सरंपच निवडीसाठी ही तिसरी निवडणूक होत असून, यामुळे मोठी चुरस होणार आहे. काही प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागल्याने अनेक मातब्बरांचे भवितव्य पणाला लागणार आहे.सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मतदान १०० टक्के व्हावे यासाठी उमेदवारांचा प्रर्यत्न होता. ग्रामस्थांनी भर उन्हात मतदान केले. सकाळी हा ओघ जास्त होता. दुपार नंतर तो कमी झाला. मात्र संध्याकाळ पर्यंत तो परत वाढला.खेडराजगुरुनगर : खेड तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या ३७ सदस्य जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात होते. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सर्वत्र शांततेत सरासरी ८४.१६ टक्के मतदान झाले. उन्हामुळे दुपारी चारपर्यंत केवळ ५२ टक्के एवढेच मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची मतदारराजाला मतदानासाठी बाहेर काढताना फारच कसरत झाली. मतमोजणी सोमवारी (२८ मे) तिन्हेवाडी येथील हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुल येथे होणार आहे.दौडदौंड : दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीसाठी ८२.५१ टक्के मतदान शांततेत झाले असल्याची माहीती तहसीलदार बालाजी सोमंवशी यांनी दिली. वाखारी, पारगाव, नायगाव, पांढरेवाडी, कुरकुंभ, खोपोडी, वाटलूज, वडगावबांडे, पानवली, केडगाव या दहा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी निवडणूक झाली. खोपोडी ग्रामपंचातीच्या सरपंचपदासाठी बिनविरोध निवडणूक झाल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक झाली नाही. कुठलाही आनुचीत प्रकार घडू नये म्हणून वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी मतदा केंद्रावर मतदानासाठी गर्दी होती त्यानंतर दुपारी मतदारांची गर्दी रोडावली होती. दुपारी तीन नंतर मतदारांचा ओघ पुन्हा वाढला.भोरभोर : भोर तालुक्यातील ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन निवडणुक ३ ग्रामपंचायतीसाठी आज सरासरी ८५ टक्के मतदान शांततेत पार पडले. भोर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन करंजे व अशिंपी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. तर ३ पैकी २ ग्रामपंचायतींच्या सदस्य बिनविरोध झाले असुन एका नाटंबी ग्रामपंचायतीचे सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यांची निवडणुक झाली. यात एकुण ८५ टक्के मतदान झाले आहे.सर्वाधीक मतदान वारंवड ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मध्ये ९४ टक्के मतदान झाले आहे. तालुक्यातील रायरी व करंजे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन करंजे व अशिंपी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले आहेत. तर अशिंपीचे ७ पैकी २ जागा भरल्या असुन ५ ग्रामपंचायत सदस्यपदे रिक्त राहिले आहेत. तर नाटंबी ग्रामपंचायतीत सरपंचप महिलेसाठी राखीव असुन दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर ग्रामपंचायत सदस्याच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असुन दोन पॅनेलमध्ये निवडणुक होत आहे एकुण ७९५ मतदानापैकी ६४७ मतदान म्हणजे सरासरी ८५ टक्के मतदान झाले आहे. वरवंडला ५ सदस्य बिनविरोध झाले आहेत.शिरूरशिरूर: तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत पार पडले. तालुक्यातील अण्णापूर, शिरुर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी व वाजेवाडी या ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी साडेनऊपर्यंत सर्वत्र च सरासरी २० टक्के मतदान झाले होते. यानंतर मतदानात वाढ होत गेली. कर्डेलवाडी शिरूर ग्रामीण ह्य अण्णापूर येथे दुपारी एक पर्यंत ७० टक्के मतदान झाले. १ पर्यंत सरदवाडी येथे सरासरी मतदान झाले. मतदारांना नेण्या आणण्यासाठी वाहनांची सोय केल्याने भर उन्हातही हुपारी मतदानासाठी गर्दी दिसून आली. दुपारी तीन नंतर मतदानात वाढ झाली. अण्णापूर येथे ८१ टक्के, सरदवाडी येथे ८८ .२०टक्के, कर्डेलवाडी येथे ८९. ६३ टक्के , शिरूर ग्रामीण येथे ९० टक्के, वाजेवाडी येथे ८७.७१ येवढे मतदान झाले.पुरंदरजेजुरी : पुरंदर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांनी दिली. या ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी ४२ सरपंचपदाचे उमेदवार आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या २२४ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. प्रथमच थेट जनतेतून उमेदवार निवडण्यात येणार असल्याने मतदानात खूप उत्साह जाणवत होता. तेवढीच चुरस ही निर्माण झाली होती. तालुक्यातील वाल्हे, वीर, एखतपुर,- मुंजवडी, वनपूरी, उदाचीवाडी, राजुरी, माळशिरस, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, कोथळे, भोसलेवाडी, रानमळा, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले आहे. उन्हाळा असल्याने आज सकाळी ११ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या, दुपारी मात्र तुरळक मतदान होत होते, दुपारनंतर मात्र पुन्हा मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. वाल्हे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन चार ग्रामपंचायती निर्माण झाल्याने त्या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली होती. वाल्हे गावातील मतदान केंद्रावरील दोन गटात काहीकाळ झालेला तनावाचा प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. उद्या सासवड येथे मतमोजणी १२ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल पूर्ण झालेले असतील.बारामतीतालुक्यात रविवारी (दि. २७) पार पडलेल्या एकूण १५ ग्रामपंचायतींसाठी ८७.९ टक्के मतदान झाले. यामध्ये १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर २ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. सोमवारी(दि. २८) दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाच निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत लढत होत आहे., तर चांदगुडेवाडीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आणि भाजपा पुरस्कृत पॅनलमध्ये लढत होत आहे. तालुक्याजवळील कोºहाळे खुर्द, सुपे, वंजारवाडी, करंजे, मगरवाडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, दंडवाडी, जराडवाडी, कारखैलेवाडी, कुतवळवाडी, पानसरेवाडी, साबळेवाडी, शिर्सुफळ, उंडवडी क.प. या गावांची सार्वत्रिक निवडणूक या टप्प्यात होती. त्यापैकी मगरवाडी आणि भोंडवेवाडी ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली, तर वडगाव निंबाळकर, गोजुबावी, सांगवी, वाकी, मेडद, मोरगाव या गावांची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी वडगाव निंबाळकर आणि मेडद गाव वगळता उर्वरित चार गावांची पोटनिवडणूक बिनविरोध पार पडली. वडगाव निंबाळकरमध्ये एका जागेसाठी ६८ टक्के मतदान झाले. बारामती एमआयडीसीतील रीक्रिएशन हॉलमध्ये १५ टेबलवर मतमोजणी होणार आहे.इंदापूरतालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत ८०.३९ टक्के मतदान झाले. दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी साठी ८९.०७ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उद्या (दि.२८) सकाळी दहा वाजता नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी होणार आहे. बावडा, वकीलवस्ती, काझड, शिंदेवस्ती, लाकडी या पाच ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक व वरकुटे खुर्द, गिरवी, भिगवण, पिठेवाडी, रुई (थोरातवाडी) या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या मुदतीत बावडा ग्रामपंचायतीच्या १६ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या. शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या ९ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या.लाकडी ग्रामपंचायतीची १ जागा बिनविरोध झाली. भिगवण, वरकुटे खुर्द व गिरवी या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणूका बिनविरोध झाल्या. पिठेवाडी ग्रामपंचायतीच्या दोनपैकी एका जागेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. बावडा ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी, शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सहा जागा व काझड, वकीलवस्ती ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी व रुई व पिठेवाडी या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले....बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधूने बजावला मतदानाचा हक्कबारामती तालुक्यातील सुपे येथील मतदान केंद्र क्रमांक ४ मध्ये अश्विनी जगताप या नववधूने तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात मतदानाने केली. बोहल्यावर चढण्याअगोदर नववधू अश्विनी हिने आपला येथील शेवटचा मतदानाचा हक्क बजावला .पुढील धार्मिक विधीसाठी कारमधून मार्गस्थ झाली.
गावकारभाऱ्यांचा आज फैसला, ९० ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:11 AM