शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पीएमपीच्या ताफ्यात ८०० स्वयंचलित बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:50 AM

८०० फुल्ली आॅटोमॅटिक बस दाखल होणार असून, त्यामध्ये आॅटोमॅटिक गिअर बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेरे, आॅटोमॅटिक पॅसेजर काउंटिंग मशीन असेल.

पुणे : पीएमपीच्या ताफ्यामध्ये नव्याको-या ८०० फुल्ली आॅटोमॅटिक बस दाखल होणार असून, त्यामध्ये आॅटोमॅटिक गिअर बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेरे, आॅटोमॅटिक पॅसेजर काउंटिंग मशीन असेल. यातील ४०० बस डिझेलवर, तर ४०० सीएनजीवर चालणाºया असतील. बसखरेदीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली.सध्या पीएमपीकडे एकूण २ हजार ५५ बस आहेत. यातील १ हजार २२६ बस सीएनजीवर, तर ८०० डिझेलवर चालतात. आतापर्यंत १११ बस बाद करण्यात आल्या आहेत. यामध्ये डिझेलवर चालणाºया १०९, तर सीएनजीवरील २ बसचा समावेश आहे. आगामी काही दिवसांत २५४ बस बंद करण्यात येणार आहेत. या बस बाद झाल्यानंतर पीएमपीच्या ताफ्यात १ हजार ६९० बस शिल्लक राहणार असल्याने ८०० नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर बसची संख्या २ हजार ४९०वर पोहोचेल.>सुरक्षित प्रवासमहापालिका आणि पीएमपी प्रशासनाने घेतलेल्या बसखरेदीच्या या निर्णयावर संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये खरेदीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. यासोबतच आॅटोमॅटिक पॅसेंजर काउंटिंग म्हणजेच प्रवासी मोजणी मशीन असेल. या सर्व बस आॅटोमॅटिक गिअरच्या असतील. आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठीच्या सर्व उपाययोजना या बसमध्ये केलेल्या असणार आहेत.>आस्थापना आराखड्याला मंजुरीपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या आस्थापना आराखड्याला संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, त्या आराखड्यावर ११ वर्षांपासून चर्चा सुरू होती. तब्बल ११ हजार ५०३ कर्मचारी संख्या असलेला हा आराखडा असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली.या आस्थापना आराखड्यानुसार आता १५ हजार ५१७ ऐवजी ११ हजार ५०३ कर्मचारी संख्या असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. पदनाम संख्या आणि ग्रेड-पेमध्ये काही घट करण्यात आली आहे. तसेच जनरल विभाग, वाहतूक, कार्यशाळा आणि लेखा व वित्त असे चार विभाग करण्यात आले आहेत. सध्या सेवेत असलेल्या कोणत्याही अधिकारी व कर्मचाºयांची सेवाज्येष्ठता तसेच वेतनात कोणताही बदल होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन आस्थापनेच्या मान्य पदांवर नव्याने होणाºया नियुक्त्यांना नवीन अस्थापनेचे वेतन लागू असेल. सहायक महाव्यवस्थापक हे पद रद्द करून त्याऐवजी अभियान आणि प्रशासन अशी दोन महाव्यवस्थापक पदे तयार करण्यात येणार असल्याचेही मुंढे यांनी सांगितले.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या अनुक्रमे पीएमटी आणि पीसीएमटी या ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे २००७मध्ये एकत्रीकरण करून पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीसाठी आस्थापना आराखडा तयार करण्यात यावा, यावर स्थापनेपासूनच चर्चा सुरू होती. सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टकडून २०१३मध्ये पीएमपीला हा आराखडा तयार करून देण्यात आला होता. आवश्यक असलेले बदल न केल्याने या आराखड्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मुंढे यांनी नव्याने सुधारित आराखडा तयार केला असून, त्याला संचालक मंडळाची मान्यता मिळाली आहे.