शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

टीईटी परीक्षेस राज्यात ८ हजार ‘डुप्लिकेट’ परीक्षार्थी, परीक्षेस ९० टक्के परीक्षार्थींची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:17 AM

परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २०१३ पासून घेतली जात असून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली.

पुणे : राज्याच्या परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) काही अपवाद वगळता सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या परीक्षार्थींपैकी तब्बल ८८ ते ९० टक्के परीक्षार्थी उपस्थित होते. या परीक्षेत ८ हजार डुप्लिकेट परीक्षार्थींनी नोंदणी केल्याचे समोर आले. परीक्षेच्या पहिल्या सत्रात कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद व धुळे जिल्ह्यांत काही ठिकाणी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचलेल्या परीक्षार्थींनी गोंधळ घातला.परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २०१३ पासून घेतली जात असून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली. यापूर्वी १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेस ३ लाख ४३ हजार २८४ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती, तर २१ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या परीक्षेसाठी ४ लाख ६८ हजार ९४८ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती.

‘डुप्लिकेट’ कोणते?टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्यांमध्ये काहींनी दोन ते तीन वेळा ऑनलाइन अर्ज भरला होता, त्यांचा केवळ एकच अर्ज गृहीत धरण्यात आला. एकापेक्षा जास्त वेळा अर्ज भरणाऱ्या या ‘डुप्लिकेट’ परीक्षार्थींची संख्या तब्बल आठ हजार होती. 

राज्यातील १ हजार ४४३ परीक्षा केंद्रांवर पेपर क्रमांक १ साठी राज्यातील  २ लाख ५४ हजार ४२८ परीक्षार्थींच्या, तर पेपर क्रमांक २ साठी २ लाख १४ हजार २५० परीक्षार्थींच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.    - दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, परीक्षा परिषद 

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणेexamपरीक्षा