ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांच्या हस्ते झाले.यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, डॉ. चंद्रकांत म्हस्के, दशरथ जाधव, किरण गुजर, विश्वासराव देवकाते, संभाजी होळकर, तहसीलदार विजय पाटील, माढाचे तहसीलदार राजेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, सरपंच बाळासाहेब सरवदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोर्लेवाडी सारख्या ग्रामीण भागात ग्रामस्थ व तरुण मंडळांनी एकत्र येऊन राबविलेला महारक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांनी व्यक्त केले. दरम्यान उत्पादक शुल्क व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबीरात सहभाग घेतला होता.
१२१२२०२०-बारामती-१५