शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आरटीईचे ८२ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:10 AM

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर राबविली जात असलेली ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया कोरोनाचा वाढता ...

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर राबविली जात असलेली ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली आहे. लॉकडाऊन उठविल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. मात्र, लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश मिळालेला असताना राज्यातील तब्बल ८२ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. त्यात पुण्यातील १४ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यातील ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख २३ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची ऑनलाइन लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी निवड करण्यात आली. परंतु, अद्याप या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रत्यक्षात प्रवेश दिलेला नाही. प्रवेशासाठी पात्र ठरलेले बहुतेक विद्यार्थी सीबीएसई माध्यमाच्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणार आहेत. या शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, अद्याप विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यातच आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्यामुळे शाळांनी आरटीई प्रवेशप्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही प्रवेशप्रक्रिया किती दिवस लांबणार, हे सांगता येत नाही.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने प्रवेशप्रक्रिया स्थगित केली असली, तरी येत्या १५ मेनंतर प्रवेशप्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा पालकांना आहे. परंतु ,लॉकडाऊन वाढल्यास प्रवेशप्रक्रिया आणखी पुढे जाऊ शकते असे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

------------------------------------

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू केल्यामुळे शाळांमध्ये गर्दी होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतरच आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा विचार केला जाईल.

- दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण

---------------------------------------------

राज्यातील आरटीई प्रवेशाची आकडेवारी

जिल्हा--- जागा--- प्राप्त अर्ज ---- लॉटरीतून दिलेले प्रवेश

पुणे १४,७७३ ५५,८१३ १४,५७६

मुंबई ५,२२७ १२,९११ ३,८२५

नाशिक ४,५४४ १३,३३० ४,२०८

नागपूर ५,७२९ २४,१६७ ५,६११

ठाणे १२,०७४ १८,९५६ ९,०८८

जळगाव ३,०५६ ५,९३९ २,६९२

औरंगाबाद ३,६२५ ११,८१६ ३,४७०

जालना २,२६२ ३,५८४ १,९१८

नांदेड १,७२० ५,३१८ १,६०४

यवतमाळ १,२७५ ३,३९३ १,१५१

बीड २,२२१ ३,९३८ २,०१२

भंडारा ७९१ २,०५१ ७८४

अकोला १,९६० ४,७७ १,८१७

अहमदनगर. ३०१३ ४,८२५ २,७५३

सोलापूर २,२३१ ४,२५२ १,७३८

कोल्हापूर ३,१८१ २,६४५ २,१३७

सातारा १,९१६ २,५०० १,५९५

सांगली. १,६६७ १,४४६ ९८९