नीरा : पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी ग्रामीण रुग्णालयात तसेच नीरा, बेलसर, माळशिरस, परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रात ३२९ संशयितांची कोरोन चाचणी करण्यात आली, पैकी ८३ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. शहरी भागात १४, ग्रामीण भागात ६२, तर तालुक्याबाहेरचे ७ रुग्णांचा यात समावेश आहे. ग्रामीण भागात आता रुग्ण वाढू लागले आहेत. वीर येथील ९, तर मांडकी येथील ७ रुग्णांचे कोरोना अहवालबाधित आले आहेत. मंगळवारी तालुका ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून नीरा, परिंचे, बेलसर, माळशीरस आरोग्य केंद्राच्या अंतर्गतील गावात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
सासवडच्या ग्रामीण रुग्णालयत ८० संशयितांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली पैकी २२ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड ५, ग्रामीण भागातील १७ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. वीर ३, शिवरी, पारगाव २, भिवरी, काळेवाडी, दिवे, सुपे, वाघापूर, चिव्हेवाडी, बोपगाव, कोडीत, खळद, हिवरे प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयातून बुधवारी ७२ संशयितांच्या अँटिजन चाचण्या घेण्यात आल्या, पैकी २४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी ५, ग्रामीण भागातील १९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड, नाझरे ३, कर्नलवाडी, टेकवडी २, गुळूंचे, दिवे, हिवरे, खानवडी, नाझरे (सुपे), पिंपळे, साकुर्डे, कोल्हेकरवाडी, शेरेवाडी प्रत्येकी १ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
बुधवार दि.१९ रोजी जेजुरी येथून घेतलेल्या ४९ आरटीपीसीआर चाचण्यांपैकी १० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी ३, ग्रामीण भागातील ७ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. मांडकी, नाझरे प्रत्येकी २, वाघदरवाडी, बेलसर, पिसर्वे प्रत्येकी १ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
तर बुधवारी ग्रामीण कार्यक्षेत्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत ॲंटिजेन टेस्ट अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा येथे ४९ संशयितांची चाचणी करण्यात आली, पैकी १४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. मांडकी ५, नीरा, पिंपरे (खुर्द) २, तालुक्याबाहेरील ०५ रुग्ण आहेत. निंबुत ३, फरांदेनगर, पाडेगाव प्रत्येकी १ तालुक्यातील ९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे २९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली, पैकी ८ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. वीर ६, तालुक्या बाहेचे शिरवळ येथील २ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे ४८ संशयीतांची कोरोना चाचणी करण्यात आली, पैकी ४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. आंबोडी २, पिसर्वे २, प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे २ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली पैकी सासवडच्या १ रुग्णाचा अहवाल बाधित आला आहे.
मंगळवार दि. १८ रोजी पर्यंत तालुक्यात १ हजार २५६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १८३ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले.
बुधवारी ग्रामीण भागातील वीर येथील ९, तर मांडकी येथील ७ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. मांडकी येथे दहा ते बारा दिवसांपूर्वी यात्रा झाली यात्रा कमी लोकांत केली असे प्रशासन सांगत असले तरी प्रत्यक्षात देव दर्शन व इतर कार्यक्रमांना लोक गावत दिसून आले. गावात परगावाहून लोक आले होते. त्यामुळे आता रुग्णसंख्या वाढत असल्याची कुजबूज गावात होत आहे.