पुणे : शहरात गुरूवारी २८ तारखेला ८३ नवे कोरोनोबाधित आढळून आले असून, दिवसभरात ६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ९६१ जणांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी १.६७ टक्के इतकी आहे. शहरात ८४५ सक्रिय रूग्ण असून, आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला. यापैकी तीन जण हे पुण्याबाहेरील आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १३१ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ११६ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३५ लाख ४९ हजार ९८८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार ९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ९४ हजार १८० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Pune Corona News: शहरात गुरूवारी ८३ जण कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 7:02 PM