पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २६ हजार जणांनी नव मतदार म्हणून नोंदणी केली असून राज्यात ती सर्वाधिक आहे. यातील ८४ हजार ४४४ नवमतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तर ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष पडताळणीत तफावत आढळल्याने १४ हजार १३१ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, राज्यात ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यांदी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नवमतदारांची नोंदणी, नाव पत्ता व फोटोतील दुरुस्ती आणि मयतांसह दुबार मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच मतदारांच्या पडताळणीचे कामही सुरू आहे. त्यानंतर ५ जानेवारी २०२४ ला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार, पुणे जिल्ह्यात जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू आहे. नवमतदारांसाठी - अर्ज क्रमांक सहा, मयत अथवा दुबारांची नावे वगळण्यासाठी अर्ज क्रमांक सात आणि दुरुस्तीसाठी - अर्ज क्रमांक आठ असे भरण्यात आले होते. ऑनलाईन आलेले अर्ज मतदान केंद्र अधिकाऱ्यांना देण्यात येतात. हे अधिकारी मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करतात. त्यात तफावत आढळल्यास अर्ज बाद केला जातो. तर पडताळणी योग्य असल्यास अर्ज स्वीकारला जातो.
त्यानुसार नवमतदारांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यात १ लाख २६ हजार जणांनी अर्ज केले होते. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. यातील ८४ हजार ४४४ नवमतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तर ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष पडताळणीत तफावत आढळल्याने १४ हजार १३१ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तसेच १७ हजार ९ अर्ज मतदान केंद्र अधिकाऱ्यांना अद्याप सोपविण्यात आलेले नाहीत. तर मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी पडताळणी केलेल्या २७ हजार ४९७ अर्जांवर स्वीकृतीची मोहोर २७ ऑक्टोबरनंतर उमटविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २४ हजार हजार ४४४ मतदारांची नावे दुबार अथवा मयत झाल्याच्या कारणास्तव वगळण्यासाठी तसेच नावात बदल अथवा दुरुस्ती करण्यासंदर्भात ५० हजार ८८८ जणांनी अर्ज केले होते. त्या सर्व अर्जदारांच्या अर्जानुसार मतदारयादीत समावेशन, दुरुस्ती आणि वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.मतदारयादीतील दुबार अथवा मयतांची नावे वगळण्यासाठी २४ हजार ४४४ अर्ज प्राप्त झाले होते.
त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारसंघातील सर्वाधिक नावे वगळण्यात आली आहेत. त्या उलट पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील मतदारसंघात कमी प्रमाणात दुबार अथवा मयतांची नावे वगळण्यासाठी अर्ज आले आहेत. जिल्ह्यातील २१ मतदारसंघात सर्वाधिक दुबार अथवा मयतांची इंदापूर मतदासंघातून ३०१७ जणांची नावे वगळली आहेत. त्या पाठोपाठ दौंडमधून, तसेच वडगाव शेरी मतदारसंघातून २१६७ जणांची नावे वगळली आहेत. सर्वाधिक कमी पुरंदर मतदारसंघात ३०१ जणांची, तसेच पुणे कँटोन्मेंटमधील ४८७ मतदारांची नावे वगळली आहेत.
मतदारसंघ .......... नवमतदार.....दुबार/मयत वगळले.....दुरुस्ती.......एकूणवडगाव शेरी...............६८२३.................२१६७.................. ५५०६..........१४,४९६
शिवाजीनगर..............२२६५..................८४१...................१८१९...............४९२५कोथरूड ...................२४६३.................९६३..................२४०३................५८२९
खडकवासला..................४६९३...............७१७..................२२८२.........७६९२पर्वती ..........................२५३५.............९६८..............२११२.............५६१५
हडपसर .....................८१९४...............८२७.............३७४९...........१२७७०पुणे कँटोन्मेंट ................२३२८..........४८७...............११९२.............४००७
कसबा पेठ...........१९९९.................१३२३..........११३२.................४४५४चिंचवड ...............८७२२................१०२७..............५२४९.............१४९९८
पिंपरी ................३४७८................३९६...............३००१............६८७५भोसरी ............ ६११२...............८७८.............५२८१.............१२२७१
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुमारे एक लाख ६० हजार जणांनी अर्ज केले आहेत. गेल्या नऊ महिन्यात सप्टेंबर अखेर मतदार यादीत हे बदल करण्यात आले आहेत. येत्या ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे.
- मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे