आसखेड : खेड, शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना वरदान ठरलेल्या भामा-आसखेड धरण परिसरात यंदा ५०४ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १३० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात ७ टक्के साठा कमी झाला आहे. पावसामुळे भामा-आसखेड धरणात सध्या ८४.०४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तो गतवर्षी ९१.४१ टक्के इतका होता, अशी माहिती भामा-आसखेडचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली. धरणाच्या पाण्याची पातळी सध्या ६६९.१६ इतकी असून, एकूण क्षमता ८.१४ आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तीव्रता धरण परिसरात कमी झाल्याने अवघ्या १ मिलिमीटर पावसाची नोंद आज दिवसभरात झाली. तर, सध्या एकूण पाणीसाठा १९५.९७३ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १८२.४५१ दशलक्ष घनमीटर इतका आहे.>गतवर्षी कमी पाणीसाठा होता, तरीही जुलैअखेर धरणात ९१.४१ टक्के पाणी होते. तर, एकूण पाणीसाठा २१२.००६ दशलक्ष घनमीटर व उपयुक्त १९८.४८३ दलघमीइतका होता. विहिरी भरलेल्या असल्या, तरी समाधानकारक व पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरीवर्ग अद्याप आहे.
भामा-आसखेड धरणात ८४.०४ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:07 AM