पुणे : गुरूवारी शहरात नव्याने ८५ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ हजार २२७ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी १.६२ टक्के आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी शहरातील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. मात्र शहराबाहेरील एक जण उपचारादरम्यान दगावला आहे. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या ९४ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५७ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरात आतापर्यंत ३६ लाख ९४ हजार ८२० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले ५ लाख ६ हजार ८८१ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९६ हजार ९१० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८६८ इतकी आहे.