तालुक्यात संध्याकाळी ५.३० वाजेपर्यत ८६.६९ टक्के मतदान झाले.तालुक्यातील १४८०२ मतदारांपैकी ६८६७ पुरुष व ५९६५ महिला असे एकुण १२८३२
यांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहीती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.वेल्हे तालुक्यात एकुण २० ग्रामपंचायतीसाठी ४९ प्रभागातुन १९९ उमेदवार रिंगणात होते.तालुक्यात एकुण मतदान १४८०२ असुन त्यापैकी
पुरुष ६८६७ व महिला ५९६५ असे एकुण १२८३२ मतदान झाले आहे.तालुक्यात सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ग्रामपंचायतीपैकी मार्गासनी मध्ये ८२.९६ टक्के,
विंझरमध्ये ८५.१८ टक्के,अंत्रोलीमध्ये ९१ टक्के,करंजावणेमध्ये ८७.७० टक्के,ओसाडेमध्ये ८४.९६ टक्के,वेल्हे बुद्रुक मध्ये ८१.६० टक्के मतदान झाले आहे.
कोदवडी ८८.१०,खामगाव ८७.८३,मेरावणे ८६.६७,निगडे बुद्रुक ९०.०७,मालवली ८८.८२,वरसगाव ८४.४०,वांजळे ९२.६४,लाशिरगाव ८९.०४ पाबे ८४.४५
रांजणे ९१.२७,साखर ९०.४३,आंबेड ८६.४३,घिसर ७८.६४,हिरपोडी ९१.७४ टक्के मतदान झाले
तालुक्यात सकाळपासुनच मतदान केंद्रावर गर्दी पाहवयास मिळाली.मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी पाहावयास मिळाली, तालुक्यात मतदान शांततेत झाले असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार
यांनी सांगितले.निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी निवडणुक निरीक्षक दत्तात्रय काळे व तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी विविध मतदार
केंद्रावर जाऊन पाहणी केली.तसेच तालुक्यातील मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाकडुन सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग,आदी गोष्टीची व्यवस्था
करण्यात आली होती.मार्गासनी मतदान केंद्रावर डॅा,नितिन बेनके,आरोग्य सेविका काजळे अंगणवाडी सेविका सुशिला वालगुडे,आशा वर्कर
स्वाती वालगुडे यांनी कोरोनाविषयक जनजागृती करत मतदानासाठी लोकांना सोशल डिस्टंन्स ठेवणे,आदी गोष्टी केल्या.