शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

‘एफडीए’कडून ८९ छापे

By admin | Published: April 19, 2016 12:59 AM

अन्न व औषध विभागाच्या परिमंडळ चारच्या पथकाने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वर्षभरात ८९ ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई केली.

भोसरी : अन्न व औषध विभागाच्या परिमंडळ चारच्या पथकाने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वर्षभरात ८९ ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई केली. जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड हद्दीत टाकलेल्या छाप्यांत सुमारे २२ लाख ८१ हजार ८९९ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. वर्षभरात अन्न व औषध आस्थापनेकडून २८२ तपासण्या घेण्यात आल्या. त्यातील ७८ प्रकरणांतील तडजोडीत २० लाख ६३ हजारांची दंडवसुली करण्यात आली. शहरातील अन्न व्यावसायिकांवर अन्न व औषध विभागातर्फे टाकण्यात आलेल्या छाप्यांत तब्बल २० लाख ६२ हजार रुपये किमतीचा एक हजार ४८ किलो मिल्क केक व स्पेशल बर्फी जप्त करण्यात आली. ती शहरातील या वर्षातील अन्नपदार्थांतील सर्वांत मोठी कारवाई होती. अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईत वर्षभरात दोन हजार ४२२ किलो भेसळयुक्त साठा सापडला. त्याची किंमत सुमारे २१ लाख ४७ हजार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत तपासणीसाठी १८६ नमुने घेण्यात आले होते. त्यातील २४ नमुने असुरक्षित आढळून आले, तर २१ नमुने कमी दर्जाचे आढळले. असुरक्षित आढळलेल्या नमुन्यातील खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. कमी दर्जाच्या नमुन्यांची सुनावणी विभागीय अधिकाऱ्यांकडे घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.(वार्ताहर)