पुणे : जिल्ह्यातील एमआयडीसी आणि अन्य उद्योग-धंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु होत आहेत. गेल्या गेल्या आठ-दहा दिवसांत जिल्ह्यातील १७ एमआयडीसींमध्ये ८९० युनिट, तर एमआयडीसी क्षेत्राबाहेर २ हजार ५९४ उद्योग सुरु झाले आहेत. या ठिकाणी तब्बल २ लाख ६९ हजार ५७२ कर्मचारी कामावर दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत या परिस्थितीमध्ये आणखी सुधारणा होईल, अशी माहिती एमआयडीसी अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली.कोरोनाचे संकट आणि संपूर्ण देशात जाहीर झालेला लॉकडाऊन यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी आणि उद्योग- धंदे ठप्प झाले होते. परंतु शासनाच्या आदेशानंतर ३ मे नंतर हळूहळू सर्व उद्योग-धंदे सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात कन्टमेन्ट झोनच्या बाहेर कोणत्याही उद्योग-धंदे सुरु करण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. केवळ हे सुरु करताना शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे म्हणजेस सुरक्षित अंतर राखणे व सॅनिटायझेशन बाबत कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरु होऊ लागले आहेत. तर एमआयडीसी क्षेत्राबाहेर देखील सध्या बहुतेक उद्योग,धंदे पूर्ववत आहेत.पुणे जिल्ह्यात चाकण, रांजणगाव, तळेगाव, हिंजवडी, बारामती, कुरकुंभ, जेजुरी, भिगवण, खेड, तळवडे, खराडी या सर्व एमआयडीसी मध्ये बहुतेक कारखाने हळूहळू सुरु होऊ लागले आहे. जिल्ह्यात १७ एमआयडीसीमध्ये ४ हजार ६२९ युनिट असून, आठ दिवसांत ८९० युनिट सुरुझाले असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.--------------------पुणे, पिंपरी चिंचवडमधून कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वाहनाद्वारे प्रवास करण्यास बंदीपुणे जिल्ह्यातील बहुतेक एमआयडीसी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात. परंतु सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधून कोणत्याही कर्मचारी, कामगार यांना वैयक्तीक दुचाकी अथवा चार चाकी वाहनाने प्रवास कण्यास बंदी आहे. यामुळे केवळ संबंधित कंपनीकडून डेटिकेटेड ट्रान्सपोर्ट, बस, मिनी बस मधून कर्मचारी, कामगारांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.------------------------------जिल्ह्यातील प्रमुख एमआयडीसीमधील सद्यस्थितीएमआयडीसी क्षेत्र एकूण उद्योग सुरु उद्योगइंदापूर २४ १८कुरकुंभ १७६ ६९जेजुरी ३२१ ७७भिंगवण ०८ ०३तळवडे ४२ ०४खराडी ७ ७खेड २३ १३बारामती ४९७ १३२चाकण ६९७ २७२रांजणगाव ३५० ९८तळेगाव १४४ ११८
पुणे जिल्ह्यात एमआयडीसी क्षेत्रात ८९० युनिट; तर एमआयडीसी क्षेत्राबाहेर २५९४ उद्योग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 5:14 PM
लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील एमआयडीसी आणि अन्य उद्योग-धंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु
ठळक मुद्दे२ लाख ६९ हजार ५७३ कर्मचारी कामावर दाखलचाकण, रांजणगाव, तळेगाव, हिंजवडी, बारामती, कुरकुंभ, भिगवण, खेड, या सर्व एमआयडीसी सुरुपुणे, पिंपरी चिंचवडमधून कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वाहनाद्वारे प्रवास करण्यास बंदी