शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

हवाला रॅकेट प्रकरणी ९ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:32 AM

पुणे : गुटखा विक्रीच्या पैशातील हवाला रॅकेट प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने बुधवारी रात्री ५ ठिकाणी छापे ...

पुणे : गुटखा विक्रीच्या पैशातील हवाला रॅकेट प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने बुधवारी रात्री ५ ठिकाणी छापे घालून ९ जणांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ४७ लाख ३८ हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य जप्त केले आहे.

हितेश माणिकलाल गज्जर (वय ४८, रा. गंगाधाम, कोंढवा), अविनाश कांतीलाल व्यास (४७, रा. बुधवार पेठ), राहुलकुमार महेंद्रभाई पटेल (३८, रा. शुक्रवार पेठ), जिग्नेश नटवरलाल पटेल (४६, रा. गुरुदेव अपार्टमेंट, शुक्रवार पेठ), जयेश मुन्नाभाई दवे (४६, रा. मंत्री किशोर बिल्डिंग, बुधवार पेठ), विपुल सतीश पटेल (३८, रा. मंत्री किशोर बिल्डिंग, बुधवार पेठ), गजेंद्र रामभाई पटेल (४७, रा. शनिवार पेठ) आणि किरणसिंग हिमतुली चौहान (२९, रा. बुधवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, न्यायालयात हजर करण्यात आलेल्या नऊ जणांना जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक प्रवीण भागुजी कराळे (३८) यांनी फिर्याद दिली आहे.

बुधवार पेठ व शनिवार पेठेतील मंत्री किशोर आर्केड येथील ३ कार्यालये, शनिवार पेठेतील गणेशकृपा, पेपर गल्ली या पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांना माहिती मिळाली, की खराडीत सुरेश अगरवाल (५४, रा. खराडी) हा कस्टम ड्युटी चुकवून पानमसाला, गुटखा, परदेशी बनावटीच्या सिगारेटची विक्री करत आहे. त्यानुसार अगरवाल याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नवनाथ नामदेव काळभोर गुटखा पुरवित असल्याची कबुली दिली होती.

गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत गुटख्याचे मुख्य दोन विक्रेते असून हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पथके तयार करण्यात आली होती. बुधवारी सकाळी ७ वाजता ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या ठिकाणी ३ कोटी ४७ लाखांची रोकड, ९ मोबाईल, २ डीव्हीआर, २ पैसे मोजण्याच्या मशीन असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

----------------------------------