पुणे : आनंद, चैतन्य आणि उत्साह घेऊन येणारी दिवाळी यंदा ‘पीएमपी’लाही लाभदायी ठरली आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या या ७ दिवसांत दररोज सरासरी १ कोटी २९ लाख ४८ हजार ४८० रुपये याप्रमाणे एकूण ९ कोटी ६ लाख ३९ हजार ३५९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ही कमाई दि. ९ ते १५ नोव्हेंबर दरम्यानची आहे.
दरम्यान, पीएमपीमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम नोंदवत आहे. ‘पीएमपी’ने दिवाळीत अशा फुकट्या प्रवाशांकडून दिवाळीच्या सात दिवसांत तब्बल १ लाख ४६ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत पीएमपीकडे यंदा ४२ टक्के अधिक महसूल जमा झाला आहे. २०२२ मध्ये महामंडळाला ६ कोटी ३५ लाख ८१ हजार ६९३ रुपये महसूल मिळाला होता. तसेच २०२१ मध्ये ५ कोटी ३४ लाख २४ हजार ६९१ कोटींचा महसूल मिळाला होता.
सात दिवसांत मिळालेला महसूल?
९ नोव्हेंबर - १,५६,११,९३५
१० नोव्हेंबर - १,३१,९९,६२९
११ नोव्हेंबर - १,२६,७५,९६५
१२ नोव्हेंबर - ९१,४०,५०७
१३- नोव्हेंबर - १,३१,५०,८४५
१४ नोव्हेंबर - १,२८,९१,५२४
१५ नोव्हेंबर - १,३९,६८,९४५