गेल्या वर्षभरापासून राहूबेट परीसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढले असून त्याने आत्तापर्यंत सुमारे शंभर ते दीडशेहून अधिक शेळ्या, मेंढ्या,कालवडी या जनावरांचा फडशा पाडला आहे. रात्रीअपरात्री शेतात उसाला पाणी देण्यासाठी कृषी विद्युत पंप चालू करण्यासाठी जाण्यासाठी कोणाचेही भितीने धाडस होत नसून परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा पंचनामा यवत वनविभागाचे वनरक्षक शिवकुमार बोंबले, नानासाहेब चव्हाण, कर्मचारी सुरेश पवार यांच्या पथकाने केला आहे. सरपंच सागर शेलार, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी परिसरातील ग्रामस्थांनी भयभीत न होता सतर्क राहून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.