पिंपरी : शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या १२६ झाली आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये अचानक डोके वर काढलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. या जीवघेण्या आजाराची बुधवारी (दि. १२) सहा आणि गुरुवारी (दि. १३) तीन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली.दोन दिवसांत नऊ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे रुग्णांची संख्या १२६ झाली आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याच्या संख्येमध्ये वाढच होत आहे. पोषक वातावरणामुळे हा आजार बळावत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागासह नागरिकांची चिंता वाढत आहे. महापालिकेने रिक्षांवर स्पीकर लावून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये गरोदर माता, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेल्यांना मोफत लस देण्यात येत आहे. सतर्कतेचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
शहरात नऊ जणांना स्वाइन फ्लूची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 2:27 AM