युगंधर ताजणे पुणे : वाढते शहरीकरण, त्यामुळे अरुंद होत चाललेले रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्तपणे चाललेली वाहतूक, वाहतुकीच्या नियमांचे सरसकटपणे होणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुसºया बाजूला केवळ महामार्गावरच नव्हे तर शहरात चारचाकी वाहने चालविणाºया वाहनचालकांकडून सीट बेल्ट न लावल्यामुळे होणारे अपघात गंभीर स्वरूपाचे आहेत. यात प्रामुख्याने रिअर सीट बेल्ट न लावणाºया ९० टक्के वाहनचालकांचा जीव टांगणीला असल्याचे दिसून आले आहे. निस्सान-सेव्ह लाईफच्या संशोधन अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.भारतातील रिअर सीट बेल्ट वापर आणि चाइल्ड रोड सेफ्टीच्या माध्यमातून असे निदर्शनास आले ज्यात, ९० टक्क्यांहून अधिक वाहनचालकांनी आपण रिअर बेल्टचा वापर करत नसल्याचे सांगितले. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, जयपूर, कोलकाता आणि लखनऊ या प्रमुख शहरांमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणात्मक सर्वेक्षणामधून ही बाब समोर आली आहे. तसेच सर्वेक्षणातून ९८ टक्के प्रतिसादक रिअर सीट बेल्टचा वापर करत नाहीत. तर ७० टक्क्यांहून अधिक लोकांना रिअर सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्वमाहीत असतानादेखील ते न वापरण्यास पसंती देतात.या अहवालात मुलांच्या प्रवासादरम्यानच्या सुरक्षिततेवर देखील प्रकाश टाकला असून, त्यातून अनेक निष्कर्ष समोर आले आहेत. दोन-तृतीयांश (६४ टक्के पालकांना) पालकांच्या मते, रस्ते मुलांसाठी सुरक्षित नसल्याची त्यांचे मतनॅशनल स्टडीबाबत बोलताना सेव्ह लाइफ फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष तिवारी म्हणाले, ‘या अहवालाने भारतात प्रथमच रस्त्यांवर मुलांच्या सुरक्षिततेची चिंताजनक बाब आणि लोकांचा रिअर सीट बेल्टच्या वापरासंबंधी समज व अपेक्षांनासमोर आणले आहे. देशात चाइल्ड हेल्मेट्स, शालेय क्षेत्रांमध्ये सुरक्षितता उपाय, चाइल्ड सीट्स, स्कूलबस व व्हॅॅनचालकांसाठी विशेष प्रशिक्षण आणि प्रौढ व्यक्तींच्या जबाबदारी अशा उच्च मूलभूत तरतुदी सक्तीच्या केल्या पाहिजेत.अहवालातील महत्त्वाचे मुद्देफक्त २७.७ टक्के वाहनचालकांना हे माहीत होते, ज्यात भारतातील सध्याच्या कायद्यानुसार रिअर सीट बेल्टचा वापर अनिवार्य आहे. तसेच ९१.४ टक्के वाहनचालकांनी देशात चाइल्ड रोड सेफ्टी कायदा बनवण्याचा उल्लेख केला.९२.८ टक्के वाहनचालकांना चाइल्ड हेल्मेट्सचे सुरक्षितताविषयक फायदे माहीत असतानादेखील फक्त २०.१ टक्के वाहनचालकांकडे चाइल्ड हेल्मेट होते. ही बाब रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) नुकतेच सादर केलेल्या माहितीशी जुळणारी आहे. २०१७मध्ये रस्त्यांवरील अपघातांमुळे ९,४०८ मुलांचा मृत्यू झाला. यात प्रत्येक दिवशी जवळपास २६ मुलांचा मृत्यू होतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.पुण्यात मागील वर्षी २०१८ मध्ये एकूण ५० हजार ११९ सीट बेल्ट न लावणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून १ कोटी २३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक प्रशासनाच्या वतीने सीट बेल्ट न लावणाºयांवर कारवाई करण्यात येत असून, पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर सीट बेल्ट न लावल्यामुळे होणाºया अपघाताची संख्या लक्षणीय आहे.>रिअर सीट बेल्टच्या वापरावर लक्ष केंद्रित करणारभारतात रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पण रिअर सीट बेल्टच्या महत्त्वाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १२ शहरांमधील २४० शाळांमधील २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत त्यांना रिअर सीट बेल्टचा वापर आणि रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.- थॉमस कुहल, अध्यक्ष, निस्सान इंडिया
रिअर सीट बेल्ट न लावणाऱ्या ९० टक्के चालकांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 1:56 AM