पुणे :पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासलाधरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत २६.२४ टीएमसी म्हणजे ९०.०३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १.९५ टीएमसीने म्हणजे ७ टक्के पाणीसाठा जादा आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या चारही धरणांत २६.२४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
धरण टीएमसी टक्के
खडकवासला - १.७३ ८७.७५
पानशेत - १०. ४४ ९८.०८
वरसगाव - ११.४७ ८९.४५
टेमघर - २.६० ७०.०९
एकूण - २६.२४ ९०.०३