यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, तहसीलदार विजय पाटील, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, ग्रामीण रुग्णालय रुईचे डॉ. सुनील दराडे, रक्तपेढी प्रमुख डॉ. सोमनाथ खेडकर, रक्त संकलन अधिकारी डॉ. गौरव देखमुख, समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण बर्डे, डॉ. अनामिका सोमावार, डॉ. स्मिता गवळी आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरास बारामती तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व पणदरे दुरक्षेत्र येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पार पडले. मोरगाव, सोमेश्वर नगर व सुपे येथील उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते पार पडले. या पाचही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव निंबाळकर येथे ३००, पणदरे २००, सोमेश्वरनगर २००, सुपे २२५ व मोरगाव येथे १५० रक्त बॅग संकलन करण्यात आले.
महिला रुग्णालयात ९२ बॅग रक्त संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:12 AM