पुणे : पुणे विभागीय मंडळातील २ लाख ४० हजार ६९२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. त्यापैकी २ लाख २४ हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल ९३.३४ टक्के एवढा असून राज्यात काेकण विभागीय मंडळानंतर दुसरा क्रमांकावर आहे. पुणे विभागातही मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा सुमारे ४ टक्के जास्त आहे.
पुणे विभागात १ लाख ३२ हजार ८०० मुले तर १ लाख ७ हजार ८९२ मुली असे एकुण २ लाख ४० हजार ६९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी १ लाख २१ हजार ४२७ मुले आणि १ लाख ३ हजार २३८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण हाेण्याचे प्रमाण ९१.४३ तर मुलींचे उत्तीर्ण हाेण्याचे प्रमाण ९५.६८ टक्के एवढे आहे. यासह पुणे विभागात ६ हजार ६५१ पुनर्रपरीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखा निकालात आघाडीवर
विज्ञान शाखेच्या १ लाख १९ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी १ लाख १५ हजार ९४३ म्हणजेच ९६. ८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेच्या ५४ हजार १६३ विद्यार्थ्यांपैकी ४६ हजार ६६१ विद्यार्थी ८६.१४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखा ५९ हजार ५७५ पैकी ५५ हजार २९६ विद्यार्थी ९२.८१ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम ६५३२ पैकी ६ हजार ७२ विद्यार्थी ९२.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आयटीआयच्या ७४५ पैकी ६९३ विद्यार्थी ९३ टक्के उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे विभाग जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
जिल्हा परीक्षेस बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारीपुणे १३०८८५ ११९२९७ ९१.१४ अहमदनगर ६२७३९ ५८१२० ९२.६३साेलापूर ५३७१९ ५०३३४ ९३.६९