शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?
2
Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"
3
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
4
त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
6
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे
7
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
8
शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
9
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
10
निकृष्ट दर्जाचे फूड आढळल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार ; पालघरच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लेखी फतवा
11
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
12
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
13
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
14
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
15
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
16
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
17
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
18
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
19
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
20
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

पुण्यात ९४ वर्षीय याेद्ध्याचे आत्मक्लेश आंदोलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 9:14 AM

राज्यभरातून पाठिंबा : समर्थनार्थ आज प्रत्येक जिल्ह्यात केले जाणार उपोषण

पुणे : हल्ली निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली.

तसेच या प्रकाराचा निषेध म्हणून ९४ वर्षीय याेद्धा अर्थात डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन पुकारले आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच होते. या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळत असून, डॉ. आढाव यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यातील जिल्ह्यांमध्येही असेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी सकाळी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत. शुक्रवारी सायंकाळीच ते भेटणार होते. मात्र, त्यांना परगावाहून येण्यास उशीर झाल्यामुळे ही भेट शनिवारी ठरविली आहे.

डॉ. आढाव यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, गोरख मेंगडे यांनीही आपले उपोषण सुरू ठेवले आहे. ३० नोव्हेंबरला (शनिवारी) उपोषण थांबवणार असल्याचे डॉ. आढाव यांनी जाहीर केले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी डॉ. आढाव यांनी सुरू केलेल्या या उपोषणामुळे कामगार चळवळीतील त्यांचे सहकारी चिंतित असून, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे.

महात्मा गांधी भवनचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, माजी मंत्री, आमदार डाॅ. विश्वजीत कदम, ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे, किरण मोघे, मेधा थत्ते, भाई संपतराव पवार, धनाजी गुरव व अन्य स्थानिक पदाधिकारी, नेते यांनी शुक्रवारी उपोषणस्थळी येऊन डॉ. आढाव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळेच हे आत्मक्लेश आंदोलन आहे.- डाॅ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaba Adhavबाबा आढावElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024