डॉ. देवकर म्हणाले की, वेल्हे तालुक्यामध्ये लसीकरणासाठी सुरुवातीला ११ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते . ४५ वयाच्या वरील नागरिकांसाठी या केंद्रावर लस देण्यात आली. ज्या ठिकाणी लसीकरण केंद्राची मागणी होत आहे त्या ठिकाणी ताबडतोब लसीकरण केंद्र सुरू केले जात आहे. सध्या तालुक्यामध्ये पाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पासली, प्राथमिक आरोग्य केंद्र करंजावणे, ग्रामीण रुग्णालय वेल्हे तसेच पानशेत आरोग्य पथक वांगणी उपकेंद्रावर लसीकरण सुरू आहे.
तालुक्यामध्ये एकूण १६ हजार २२९ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. फक्त पाच टक्के काम शिल्लक राहिले आहे. या पाच टक्क्यांमध्ये काही लोक स्थलांतरित झालेले असल्याने लसीकरण रखडले आहे. आत्तापर्यंत ११००० लोकांना लसीकरण करण्यात आलेले आहे. आरोग्य विभागाकडून गावागावांमध्ये लसीकरणासाठी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी ताई, आशा, ग्रामसेवक, तलाठी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील प्रयत्न करीत आहेत. गावनिहाय याद्या करून लसीकरणासाठी लोकांना पाठवत आहेत.