पुणे : पुण्यातील वाहतूककोंडीची समस्या सोडवणायच्या दृष्टीनं मेट्रो प्रकल्प अंमलात आणण्यात आला आहे. शहरात उपनगरांबरोबरच मध्यवर्ती भागातही मेट्रोचं काम जलद्गतीनं सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महामेट्रोच्या वतीनं विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामध्ये १० पदांसाठी तब्बल ९६ जागा भरण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवरून देण्यात आली आहे.
पदासाठी लागणारी शैक्षणिकपात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. पुणे हे नोकरीचं ठिकाण असणार आहे.
पुणे मेट्रो रेल्वेत रिक्त जागांमध्ये अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, खाते सहाय्यक या पदांचा समावेश आहे. वरिष्ठ पदांपासून ते इतर सर्व पदांसाठी २५ हजार ते २ लाखांपर्यंत पगार देण्यात येणार आहे.
पदांसाठी वयोमर्यादा
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक - वयोमर्यादा ५३ वर्षेवरिष्ठ उपमहाव्यवस्थापक - वयोमर्यादा ४८ वर्षे उपमहाव्यवस्थापक - वयोमर्यादा ४५ वर्षेसहाय्यक व्यवस्थापक - वयोमर्यादा ३५ वर्षेवरिष्ठ स्थानक नियंत्रक - वयोमर्यादा वय ४० वर्षेवरिष्ठ विभाग अभियंता - वयोमर्यादा ४० वर्षेविभाग अभियंता - वयोमर्यादा ४० वर्षेकनिष्ठ अभियंता - वयोमर्यादा ४० वर्षेवरिष्ठ तंत्रज्ञ - वयोमर्यादा ४० वर्षे खाते सहाय्यक - वयोमर्यादा ३२ वर्षे
२३ सप्टेंबर रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी पुणे मेट्रो रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.punemetrorail.org वर गेल्यावर करिअर सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता.