आसखेड : येथील आंबेठाण चौक ते करंजविहीरे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लवकरच या रस्त्याच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रम २०१८ या अंतर्गत १८ किलोमीटरच्या कामासाठी ९७.२६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून आंबेठाण चौक ते करंजविहीरे रस्त्याची दुरुस्ती प्रतीक्षेत होती. रस्त्यावरील खड्डे, धूळ व जड वाहतूक आदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र जनमताच्या दबावामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. आमदार सुरेश गोरे यांनी सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की, या हायब्रीड अॅन्यूईटी कार्यक्रम योजनेत कर्ज काढताना ठेकेदारास शासन जामीनदार राहाणार या प्रक्रियेत प्रशासकीय अडचणीमुळे उशीर झाला. १५ ते २० दिवसांत काम सुरू होईल. यामध्ये आंबेठाण चौक ते भांबोली या दहा किलोमीटर चारपदरी रस्त्यासाठी सुमारे ५२.२१ कोटी, आसखेड फाटा ते करंजविहिरे या सुमारे ६.४५ किलोमीटरसाठी ३४.२३ कोटी, तर करंजविहिरे ते खिंड या २ किमीसाठी १०.८२ कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आंबेठाण चौक ते करंजविहिरे-तळेगाव (आंबी) औद्योगिक वसाहत या रस्त्याने वसाहतीची अवजड वाहतूक होते. टप्पा दोन व तळेगाव वसाहतीस जोडणारा हाही एक रस्ता आहे, त्यामुळे रस्त्याच्या कुवतीपेक्षा जास्तीच्या वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे तर कित्येक ठिकाणी पूर्णपणे डांबररहित रस्ता तयार झाला. त्यामुळे नागरिकांना धूळ व गाड्याचे नुकसान, वेळेचा अपव्यय याचा त्रास सहन करावा लागला. परंतु आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर सदर रस्त्यास सुमारे ९७.२३ कोटी मंजूर झाले असले तरी यात रस्त्याच्या रुंदीकरणात येणाºया अडचणीवर विद्यमान आमदार व प्रशासन काय तोडगा काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.वाडा रस्त्यावर खड्डेवाडा : येथील गावातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहे. यामुळे येथून ये-जा करणाºया नागरिकांनायाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.येथील रस्त्यांचे काही वर्षांपूर्वी खडीकरणात झाले होते. त्यानंतर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºया नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ रस्ता दुरुस्तीची मागणी करत आहेत. गेल्या कित्येक वर्षांत या रस्त्याचे काम झालेले नाही. दरवर्षी पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील माती वाहून गेल्याने खडी मोठ्या प्रमाणात निघाली असून रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.