सरपंच अॅड. निंबाळकर व त्यांचे सहकारी सदस्यांनी नुकतीच मंत्री भरणे यांची भेट घेऊन सणसरमधील विविध विकासकामे करण्यासाठी जे प्रस्ताव सादर केले होते. त्याला भरणे यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन रुपये ९७ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
सणसर बाजारपेठ विकास करणे २० लाख, सणसर-अशोकनगर येथील स्मशानभूमी शेड बांधकाम करणे १० लाख, सणसर स्मशानभूमी बांधकाम करणे ८ लाख, सणसर स्मशानभूमी वॉल कंपाउंड दुरुस्ती करणे ६ लाख, सणसर दफनभूमी वॉल कंपाऊंड करणे १५ लाख, सणसर-साईनगर स्मशानभूमी सुशोभीकरण ८ लाख, सणसर-भवानीनगर स्मशानभूमी सुधारणा करणे ५ लाख, सणसर-भोईटेवस्ती अंतर्गत रस्ता करणे ८ लाख, सणसर-कुरवली रस्ता ते कदम घर रस्ता करणे ८ लाख, सणसर ३९ फाटा, भगतवस्ती, मोरेवस्ती हायमास्ट दिवे बसविणे ९ लाख इ. वरील विकासकामांचा समावेश आहे.