बारामती : तालुक्यात 9 हजार 741 कुटुंबांनी अद्याप वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधलेली नाहीत. तालुक्यातील 97 ग्रामपंचायतींच्या अंतर्गत तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छतागृह बांधण्यासाठी निर्मलग्राम योजनेच्या अंतर्गत जिल्हा बँकेसह अन्य वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य करण्यात आले होते.
पंचायत समितीच्या ऑक्टोबर महिन्याच्या मासिक प्रगती अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार 54 हजार 764 कुटुंबांतील 45 हजार 23 कुटुंबांनी वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. दारिद्रय़रेषेखाली असलेल्या 12 हजार 817 कुटुंबांपैकी 1क् हजार 55क् कुटुंबांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहे बांधली आहेत. तर दारिद्रय़रेषेवरील 41 हजार 847 पैकी 34 हजार 473 कुटुंबांनी स्वच्छतागृहे बांधली आहेत.
या अहवालनुसार वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामाचे उद्दिष्ट 3 हजार 52 स्वच्छतागृह होते. मात्र, यापैकी 542 बांधकामे पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे यात दारिद्रय़रेषेवरील कुटुंबाचे प्रमाण 852 तर द्रारिद्रय़रेषेवरील कुटुंबाचे प्रमाण 2 हजार 2क्क् होते. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बाबतीत मार्च 2क्14 अखेर मंजूर झालेल्या 36 स्वच्छतागृहांपैकी 26 बांधण्यात आली आहेत.तर अद्यापही 4 स्वच्छतागृहांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. (प्रतिनिधी)
4दारिद्रय़रेषेखालील, दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांना, अनुसूचित जाती व जमाती, लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन मजूर, शारीरिकदृष्टय़ा अपंग तसेच महिला कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे यांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामासाठी 12 हजार इतके प्रोत्साहनपर अनुदान मिळते.