पुणे : राज्यात स्वाईन फ्लू आजाराचे दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत २ हजार ३३७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक ७७० रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले असून, सर्वाधिक पुणे जिल्ह्यात ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या साथराेग विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्वाईन फ्लू हा श्वसनविषयक आजार असून त्याची लक्षणे व प्रसार हे दाेन्ही काेराेनाप्रमाणेच हाेताे. सध्या या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे राज्यात गणेशाेत्सवाची लगबग सुरू आहे. जनतेने योग्य खबरदारी घेऊन उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन देखील आराेग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर साथराेग विभागाने जनतेला काही निर्देश दिले आहेत. त्यामध्ये ज्या व्यक्तींना फ्लू सदृश्य लक्षणे आहेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. फ्लू सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याने वेळेवर उपचार घ्यावे.
जिल्हानिहाय रुग्णांची स्थितीजिल्हा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई - ३४८ ३ठाणे - ४७४ १४पालघर - ४४ ०रायगड - १६ १पुणे - ७७० ३३सातारा - २९ ५सांगली - ८ - २कोल्हापूर - १५९ - १३सोलापूर - ६ ०नाशिक - १९५ १२अहमदनगर - २४ ५जळगाव - ४ ०औरंगाबाद- २२ ०बीड - २६ ०अमरावती - ५ ०अकोला - ५ ०बुलडाणा - ३ १यवतमाळ - १ ०नागपूर - १९८ ९एकूण - २३३७ ९८