बारामती : जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २,०७० पाणीपुरवठा योजनांची ४५ कोटी ९० लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये बारामती मंडलातील ८२७ पाणीपुरवठा योजनांचा २२ कोटी ९७ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे. तर, पुणे ग्रामीण मंडलातील १६५ पाणीपुरवठा योजनांचा २ कोटी ४४ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील ९९२ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेकडो गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.महावितरणने दिलेल्या माहितीनुसार बारामती मंडलात ८२७ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा २२ कोटी ९७ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर, पुणे ग्रामीण मंडलातील मंचर, मुळशी, राजगुरुनगर विभागातील १६५ योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. १६५ योजनांची २ कोटी ४४ लाख थकीत आहे. वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चांगलेच चटके जाणवणार आहेत. पाणीपुरवठा बंद झाल्याने गावाची तहान भागविण्यासाठी पदाधिकाºयांची चांगलीच दमछाक होणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीवर कायमस्वरूपी तोडग्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. मात्र, वीजबिल भरण्यासाठी वसुलीअभावी पैशाची तजवीज करणार कशी, हा प्रश्न मात्र निरुत्तरितच आहे.ऐन उन्हाळ्यात वीजबिलाअभावी पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने जिल्ह्यातील २ हजार ७० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. बंद पडलेल्या ९२२ पाणीपुरवठा योजनांचा हिशेब पाहता, त्यावर अवलंबून असणाºया शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्याचे चित्र आहे.>पैशाची तजवीज करणार कशी ?बारामती मंडलमध्ये जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, भोर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे.पुणे ग्रामीण मंडलमध्ये आंबेगाव, जुन्नर, मुळशी, हवेली, खेड व मावळ या तालुक्यांचा समावेश आहे.जिल्ह्यात सर्वाधिकइंदापूर तालुक्यात १६१ पाणीपुरवठा योजनांचे ९.४७कोटी रुपये थकीत आहेत.मावळ तालुक्यात १५६- ७ कोटी ६४ लाख तर त्यानंतर खेड तालुक्यात ६ कोटी ७१ लाख थक बाकी आहे.वेल्हे तालुक्यात नसरापूर(ता. भोर)सह सर्वांत कमी ११८ ग्राहकांची ६१ लाख ८१हजार थकबाकी आहे.>शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंदनुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे़ अशा वेळी जिल्ह्यातील ९९२ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरुवातीलाच खंडित केला आहे. यामुळे शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने त्यांना आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
९९२ पाणीपुरवठा योजना ठप्प, महावितरणची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:38 AM