वेल्हे (पुणे) : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ९९ तर सदस्य पदासाठी २८४ असे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदासाठी ९९ तर १९६ सदस्य पदासाठी २८४ अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी ३५ व सदस्य पदासाठी ही १२३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
सरपंचपदासाठी सर्वाधिक ९ अर्ज दापोडे गावातून तर वाजेघर बुद्रुक, धानेप, हारपुड या गावांतून प्रत्येकी ६ अर्ज दाखल झाले आहेत. तर आंबेगाव बुद्रुक, बोरावळे, जाधववाडी, केळद, सोंडे माथना, पाल बुद्रुक या गावांतील सरपंच पदासाठी प्रत्येकी २ अर्ज आले आहेत. तर वडघर ग्रामपंचायतसाठी एकच अर्ज दाखल झाला आहे.
गावनिहाय सरपंचाचे उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे. कंसात सदस्यपदाचे अर्ज : आंबेगाव खुर्द २ (९), बालवड ३ (३), बोरावळे २ (१३), चिरमोडी ३ (७), दापोडे ९ (२२), धानेप ६ (१८), गोंडखल ३ (१२), गुंजवणे ३ (६), हारपुड ६ (८), जाधववाडी २ (१०), केळद २ (११), कोलंबी ३ (१०), कोंडगाव ३ (१४), कोशीमघर ४ (७), लव्ही. बु ३ (७), मोसे. बु ४ (५), पाल बु. २ (८), शेनवड ३ (१२), शिरकोली ४ (१८), सोंडे हिरोजी ४ (६), सोंडे कार्ला ३ (१०), सोंडे माथना २ (१३), सोंडे सरपाले ३ (६), टेकपोळे ४ (१३), वडघर १ (७), वाजेघर बु. ६ (६), वेल्हे. खुर्द ५ (१४), गिवशी ४ (९).