शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

एका दिवसात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दाखल खटला निकाली काढला

By नम्रता फडणीस | Published: April 17, 2023 3:25 PM

कौंटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पुण्याच्या न्यायालयात पत्नीने केस आणि पतीसह सासू सासरे व विवाहित नणंदेविरूद्ध गुन्हा दाखल केला होता

पुणे : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होऊ लागले, त्यामुळे ती हैद्राबादवरून पुण्यात माहेरी आली. पत्नीने कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा आणि सी आर पी सी कलम 125 अन्वये केस दाखल केली. पतीसह सासू सासरे व विवाहित नणंद यांच्याविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोघांना हैद्राबाद कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घट्स्फोट मंजूर झाल्यानंतर फिर्यादी पत्नीची साक्ष नोंदवित , कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पुण्यातील न्यायालयात प्रलंबित खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  टी. एस. गायगोळे यांनी एका दिवसात निकाली काढला. याप्रकरणातून पतीसह सासू सासरे व विवाहित नणंद यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

निलेश आणि सीमा (नाव बदललेले आहे) यांचे लग्न 2018 मध्ये झाले. लग्नानंतर ती पुण्याहून हैद्राबादला नांदायला गेली. मात्र किरकोळ कारणावरून होणा-या भांडणात त्यांचे नाते फिस्कटले. ती माहेरी निघून आली. पतीने हैद्राबाद कौंटुंबिक न्यायालयात वैवाहिक संबंध पुनसर््थापनेकरिता अर्ज दाखल केला. पण, तिने रागाच्या भरात कौंटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पुण्याच्या न्यायालयात केस आणि पतीसह सासू सासरे व विवाहित नणंदेविरूद्ध गुन्हा दाखल केला. नवरा व इतर नातेवाईकांना  सत्र न्यायालय पुणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर मध्यस्थी मार्फत वकिलांच्या प्रयत्नांनी नवरा बायको ह्यांनी आपापसात तडजोड करून संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवले आणि हैद्राबाद न्यायालयाने त्यांचा घट्स्फोट मंजूर केला. पुणे येथे प्रलंबित असलेल्या 498अ केस मध्ये नवरा सासू सासरे आणि विवाहित नंणद हजर झाले  व फिर्यादी पत्नीची साक्ष नोंदवित तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपी नवरा सासू सासरा व विवाहित नंणद यांच्या वतीने अँड अमित राठी आणि अँड रमेश परमार यांनी कामकाज पाहिले व अँड अविनाश पवार यांनी सहाय्य्य केले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नPoliceपोलिस