आमदार रवींद्र धंगेकराच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 09:52 PM2024-10-21T21:52:16+5:302024-10-21T21:52:48+5:30

माझा कसब्यातून विजय पक्का असल्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.

A case has been filed against MLA Ravindra Dhangekar Hindmata Pratishthan for violation of code of conduct | आमदार रवींद्र धंगेकराच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

आमदार रवींद्र धंगेकराच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पुणे: कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटणे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर रविवारी (दि. २०) रात्री उशिरा धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली, 'दरवर्षी माझा मित्र परिवार आनंदाची दिवाळी भेट देतो. या उपक्रमात माझा व्यक्तिशः सहभाग नाही. मला अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. माझा कसब्यातून विजय पक्का असल्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले. माझ्यासारखेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: A case has been filed against MLA Ravindra Dhangekar Hindmata Pratishthan for violation of code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.