पुणे: पोटच्या मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. अनेकदा आरोपीला मुलीच्या आईने आणि स्वतः पीडिताने समजून सांगितल्यावर देखील बापाकडून होणारा त्रास काही बंद होत नव्हता. त्यामुळे पीडिताच्या तक्रारीवरून याप्रकरणी शनिवारी (दि. १८) चंद्रकांत दशरथ भोसले (वय - ५८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ३० वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, घटनेच्या सुमारे दीड वर्षांपासून तिच्या वडिलांनी तिला अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ केली. "तुझ्यामुळे तुझी आई माझ्यासोबत बोलत नाही. तू सासरी का जात नाही." असे बोलायला सुरुवात केली. पीडितेच्या आईने आरोपी पतीला अनेकदा समजावून सांगितले, मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे अखेर पीडितेने लोणीकंद पोलीस ठाण्यात बापाविरोधात तक्रार केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.