शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

टीईटी गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपेवर अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Published: December 06, 2023 5:50 PM

शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे याच्यावर ठेवण्यात आला आहे

पुणे: टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी व राज्य परीक्षा परिषदेचा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे याच्यावर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुणे सायबर पोलिसांनी टीटीई गैरव्यवहार उघडकीस आणला होता. तुकाराम सुपे याला १७ डिसेंबर २०२१ रोजी सायबर पोलिसांनी अटक केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे याच्यावर ठेवण्यात आला आहे. 

यावेळी पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुपे याच्या घरी व इतरत्र २ कोटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपयांची रोकड आढळून आली. तसेच ७२ लाख रुपयांचे १४५ तोळे सोने सापडले होते. अशी ३ कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांच्या मालमत्तेविषयी सुपे कोणताही खुलासा करु शकले नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी अधिकारी असताना भ्रष्ट मार्गाने ही मालमत्ता मिळविली असून ती वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे चौकशी निष्पन्न झाले. १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीतील सुपे यांच्या मालमत्तेचे परिक्षण करण्यात आले. त्यानुसार प्राथमिक तपासानुसार त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, सायबर पोलिसांनी जप्त केलेली मालमत्ता ही अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावरही जमीन असून अन्य मालमत्तेची चौकशी सुरु आहे.

शिक्षणाधिकाऱ्याकडे ५.८५ कोटी अपसंपदा

सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार याच्याकडे उत्पन्नापेक्षा ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा आढळून आली आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण आनंद लोहार (वय ५०), पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४), मुलगा निखिल किरण लोहार (वय २५, सर्व रा. पाचगाव, ता. करवीर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. १५ नोव्हेबर १९९३ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यानच्या काळातील लोहार याच्या उत्पन्नापेक्षा १११ टक्के अधिक मालमत्ता आढळून आली. सांगलीचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विष्णु मारुतीराव कांबळे याच्याकडे ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची अपसंपदा आढळून आली. विष्णु कांबळे (वय ५९) आणि पत्नी जयश्री कांबळे (सर्व रा. बार्शी, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसEducationशिक्षणCrime Newsगुन्हेगारी